तुफान पावसाला सुरुवात झाली की, आजही मुंबईकरांच्या मनात २६ जुलै २००५च्या स्मृती जाग्या होतात. त्या दिवशी मुंबईतील सर्वच नद्या दुथडी भरून वाहात होत्या. सर्वाधिक संकोच झालेल्या मिठी नदीने त्या दिवशी रौर्द्र रूप धारण केले. परिणामी ८५० मुंबईकरांना प्राण गमवावे लागले आणि अब्जोवधींचे नुकसान झाले. विकासकामांच्या भाऊगर्दीत नदीपात्रात केलेले अतिक्रमण आणि तिचे एक तोंड बंद करणे मुंबईकरांच्या अंगाशी आले… म्हणूनच भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी जाणून घेवू या मिठी नदीची ही कूळकथा!