तुफान पाऊस सुरू झाला की, मुंबईकरांना थेट २६ जुलै २००५ च्या महापुराचीच आठवण होते. थोड्याशा पावसानंतरही मुंबईत पाणी साचण्यामागे आहेत काही भूशास्त्रीय कारणे. मुंबईच्या भूगर्भात असलेल्या लाव्हा थरांची रचना याला कारणीभूत आहे. ज्यामुळे मुंबईला बेटांसारखा आणि बशीसारखा आकार प्राप्त झाला आहे. पण नाल्यामध्ये वाहत येणाऱ्या फ्रिज, बेड, गाद्या यांना निसर्ग नव्हे तर मुंबईकर आणि नालेसफाई व्यवस्थित न होणे याला मुंबई महानगरपालिका आणि कंत्राटदार जबाबदार आहेत. मुंबईच्या तुंबई होण्यामागची कारणमीमांसा समजून घेवूया…