मुंबईत कांदिवली आणि मालाड पूर्वेस त्यांच्या सीमा एकत्र येतात त्याठिकाणी सुमारे २०० वर्षांपूर्वी मुंबईतील प्राचीन लेणी अस्तित्त्वात होती. मात्र ब्रिटिशांना दक्षिण मुंबईची उभारणी करताना इमारतींचे बांधकामही करायचे होते. त्या इमारतींच्या उभारणीसाठी मालाडहून चांगल्या प्रतीचा दगड आणण्यात आला. म्हणूनच त्याला ‘मालाड स्टोन’ असे म्हटले जाते. दक्षिण मुंबईतील बहुसंख्य हेरिटेज इमारती याच ‘मालाड स्टोन’मधील आहेत. मालाडहून हा दगड आणताना या लेणी ज्या डोंगरावर होत्या, तोच कापून काढण्यात आला. आता शिल्लक आहे ते केवळ एक टेकाड!