मुंबईतील सर्व नद्यांना पावसाळ्यात पूर येण्याचे प्रसंग गेल्या काही वर्षांत तसे नेहमीचेच झाले आहेत. पूर आले की, त्यानंतर आपण असे का झाले याची वायफळ चर्चा तशी नेहमीच करतो. पण कधी तरी या नद्यांच्याही मूळाशी जाऊन त्यांचे वाहणे समजून घ्यायला हवे; त्या मागचे विज्ञान आपण समजून घेतले तर नद्यांच्या पूरांना अटकाव करण्याचे मार्गही सहज आपल्या ध्यानात येतील. नद्यांची पात्रं आपण आक्रसून टाकली आहेत अतिक्रमणांनी आणि पूर आला की, नद्यांवर तर कधी निसर्गावर आरोप करून आपण मोकळे होते. पण निसर्ग हा नेहमीच नैसर्गिक मार्गाने जातो. मुंबईतील नद्यांची आणि त्यांनी समृद्ध केलेल्या या मुंबईची कथा समजून घेणे म्हणून आवश्यक ठरते!