येत्या महिन्याभरात मुंबईच्या भुयारी मेट्रोचा सिप्झ ते वांद्रे बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा सुरू होणे अपेक्षित आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये भुयारी मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली. आताच्या पिढीला मात्र असेच वाटते आहे की, हा प्रकल्प अलीकडेच अस्तित्वात आला. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे…
मुंबईच्या भुयारी मेट्रोचा ‘अंडरग्राऊंड मुंबई सबर्बन रेल्वे’ हा प्रकल्प सर्वप्रथम अस्तित्वात आला तो २० व्या शतकाच्या मध्यावर म्हणजेच तब्बल ६७ वर्षांपूर्वी. या भुयारी मेट्रो प्रकल्पामागे सर्वाधिक योगदान होते ते एका मराठी इंजिनीअरचे आणि त्यांचे नाव म्हणजे प्रभाकर ग. पाटणकर. त्यांच्या नेतृत्त्वाखाली १९५७ साली सर्वप्रथम या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे संपूर्ण आरेखन केवळ एका वर्षात पार पडले. पाटणकर हे त्यावेळेस बेस्ट प्रकल्पाचे उपमहाव्यवस्थापक म्हणून काम पाहात होते. हा प्रकल्पच त्यावेळेस ‘बेस्ट’तर्फे राबवला जाणार होता. केवळ सहा वर्षांमध्ये मुंबईमध्ये भुयारी मेट्रो धावणार होती, पण… जाणून घ्या मुंबई मेट्रोचा खराखुरा इतिहास, लोकसत्ता डॉट कॉम -‘गोष्ट मुंबई’च्या या खास भागात!