१ ऑगस्ट म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस. याच दिवशी मुंबईतील सरदारगृहात लोकमान्यांनी अखेरचा श्वास घेतला. रत्नागिरी हे जन्मस्थान, पुणे ही कर्मभूमी असे असले तरी लोकमान्यांचे मुंबईशी खासच नाते होते. मुंबईतील काही ठिकाणांना मात्र टिळकस्पर्शाने पावन होण्याचे भाग्य लाभले. डोंगरीचे कारागृह, लोकमान्यांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईत सुरू केला त्या केशवजी नाईकांच्या चाळी, स्वराज्यभूमी म्हणजे ज्या ठिकाणी लोकमान्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला… यातील काही ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन जाणून घेतलेला हा इतिहास!