भारतातील सर्वाधिक श्रीमंत आणि लोकप्रिय देवस्थानांच्या यादीत मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराचा तिसरा क्रमांक लागतो. ८० च्या दशकात या मंदिराच्या लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झाली. या मंदिराचा इतिहास मध्य युगापर्यंत मागे जातो. सिद्धीविनायकाचा संबंध मूळ मुंबईकर असलेल्या कोळी- आगरी बांधवाशी असल्याचे सांगणारी एक दंतकथा प्रचलित आहे. पूर्वी समुद्र थेट या मंदिरापर्यंत होता. नंतर भरणी घालून तो मागे हटविण्यात आला. जशी सिद्धीविनायकाची एक नाळ कोळी समाजाशी जोडलेली आहे, तशीच ती दक्षिण मुंबईतील बाणगंगेशीही जोडलेली आहे. जांभेकर महाराज, गोविंदराव फाटक आदींशी सिद्धीविनायक मंदिराचा इतिहास जोडलेला दिसतो. या प्राचीन मंदिराच्या इतिहासाविषयीचा हा विशेष भाग यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने!