बोरिवली पश्चिमेस वजिरा गावठाणामध्ये मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे गणपती मंदिर वसलेले आहे. खरे तर येथील स्वयंभू गणपती हा एका मोठ्या शिलाखंडावर वसलेला आहे. पश्चिमेकडून पाहिल्यानंतर हत्तीमुखाप्रमाणे भासमान होणारा हा शिलाखंड ८० च्या दशकापर्यंत अगदी उघडाच होता. परिसरातील आगरी- कोळी आणि सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी समाजातील मंडळी त्यांच्या घरांतील चांगल्या गोष्टींचा आरंभ या गणेशशिळेपाशीच करायची. मग घरच्या लग्नाचे पत्रिकावाटप असो वा रंगहोळी असो. या गणेश शिळेचा एक संबंध आहे तो थेट कान्हेरीला ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीशी… या गणेशशिळेचा इतिहास आणि त्याच्याशी संबंधित रंजक गोष्टींचा घेतलेला हा वेध!