दादरच्या शिवाजी पार्कवरील उद्यान गणेश मंदिर हे गणरायाचं असं एक अनोखं मंदिर आहे ज्याच्या बांधकामामध्ये एकही वीट, लोखंड किंवा स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही. हे मंदिर राजस्थानातून खास आणलेल्या पांढऱ्या शुभ्र संगमरवरामध्ये बांधण्यात आलं आहे. १९६६ गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दादर- माहीमच्या चौपाटीवर फिरण्यासाठी गेलेल्या एक गृहस्थांच्या पायाला ही मूर्ती लागली, पाण्यात सोडल्यानंतर ती मूर्ती परत त्यांच्या पायाला लागली. असं तीन वेळा झाल्यानंतर तो दैवी संकेत मानून त्यांनी मूर्ती घरी आणली… पण मग ती शिवाजी पार्कातील त्या वडाच्या झाडाखाली कशी आली आणि क्रिकेटचे दैवत असलेल्या सचिन तेंडुलकरपासून ते युवातरुण अभिनेत्री असलेल्या स्पृहा जोशी पर्यंत सारे सेलिब्रिटी तिचे भक्त कसे झाले, हे जाणून घेण्यासाठी पाहायलाच हवा गोष्ट मुंबईचीचा हा गणेशोत्सव विशेष भाग!