दादर पश्चिमेस असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना व्याख्यानासाठी पाचारण केले होते. ‘पण दलित इथे आले तर पाप लागेल’, या समजुतीने उच्चवर्णियांनी त्यांना विरोध केला. त्यानंतरच्या वर्षी दलितांनाही पूजेचा अधिकार मिळावा यासाठी प्रबोधनकार ठाकरे, रावबहादूर सी. के. बोले यांनी यशस्वी आंदोलन केले. पण त्याचेच निमित्त करून उच्चवर्णीयांनी हा उत्सवच बंद केला. ती पोकळी भरून काढण्यासाठी प्रबोधनकारांनी दादरलाच सार्वजनिक नवरात्रौत्सवाची मूहूर्तमेढ रोवली आणि महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रौत्सव प्रबोधनकार ठाकरे, डॉ. आंबेडकर आणि सी. के. बोले यांच्या प्रेरणेने सुरू झाला. दलित दांपत्याने त्यावेळेस देवीच्या घटस्थापनेचे विधि पार पाडले. या घटनेशी संबंधित इतिहास जाणून घ्यायचा आणि हे मंडळ नेमके आहे कुठे हे समजून घ्यायचे तर ‘गोष्ट मुंबईची’चा हा नवरात्रविशेष भाग पाहायलाच हवा!