मुंबईला एकूण सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. यातील भातसा आणि अप्पर वैतरणा ही राज्य शासनाची धरणे आहेत. तर तुळशी, विहार, मध्य वैतरणा, तानसा आणि मोडकसागर ही मुंबई महानगरपालिकेची धरणे आहेत. मुंबईसाठीचा पाण्याचा साठा करणारे तलाव आहेत, मुंबईपासून तब्बल १५० ते १८० किलोमीटर्स अंतरावर. खरं तर हे अंतर खूपच आहे. पण गुरुत्वीय बलाचा वापर करून या पाण्याचे वहन केले जाते. मुंबईला प्रतिदिन ४२०० दशलक्ष लीटर्स पाणी दर दिवशी लागते. ही अवाढव्य गरज नेमकी कशी भागवली जाते? किती मोठी यंत्रणा यासाठी, त्यामागे राबत असते? या व अशा अनेक उत्सुकतापूर्ण प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायलाच हवा गोष्ट मुंबईची चा हा पाणीपुरवठा विशेष भाग!