सध्या प्रतिदिन ४२०० दशलक्ष लिटर्स पाणी ही मुंबईची गरज आहे. मुंबई सध्या अवाढव्य वाढते आहे, साहजिकच पाण्याची गरजही उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. अशीही वेळ येईल की, मुंबईची गरज असेल तब्बल ५५०० दशलक्ष लिटर्स, त्यावेळेस महापालिका काय करणार? ही गरज कशी भागवणार? त्यासाठी पालिकेकडे काही विशेष योजना आहेत का? त्या कोणत्या? या व अशा अनेक उत्सुकतापूर्ण प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायलाच हवा ‘गोष्ट मुंबईची’च्या ‘मुंबईचा पाणीपुरवठा’ या मालिकेतील हा दुसरा विशेष भाग!