उमेदवारी अर्ज भरताना काय झालं?; Satyajeet Tambe यांचा मोठा खुलासानवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला होता. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांनी बंड केल्याची चर्चा देखील रंगू लागली होती. मात्र आपण सुरुवातीपासून काँग्रेसचेच उमेदवार होतो, असं सत्यजित तांबेंनी स्पष्ट केलं आहे. तर उमेदवारी अर्ज भरताना अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं याबद्दलही त्यांनी खुलासा केला आहे