महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जात आहे. गणपती उत्सवात आपल्याला वेगवेगळे देखावे बघायला मिळतात. देशाची मान अभिमानाने उंच केलेली मोहीम म्हणजे ‘चंद्रयान ३’ मोहीम होय. असाच एक भव्य देखावा पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळत असून चंद्रयानची तब्बल २५ ते ३० फूट प्रतिकृती देखावा म्हणून बनवण्यात आली आहे. हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.