Kolkata Durga Puja: कोलकातामध्ये दुर्गा पूजेनिनित्त मासिक पाळी विषयी केलं जाणार प्रबोधन
१५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचं मोठं महत्त्व असतं. त्यामित्ताने मोठी लगबग पाहायला मिळत आहे. यंदा कोलकातामधील एका दुर्गा पूजा समितीने मासिक पाळी विषयाबाबत जनजागृती करणारा अनोखा देखावा साकारला आहे.