देशभरात १५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आदिशक्तीसह स्त्री शक्तीचा तिच्या कर्तृत्वाचा अभूतपूर्व जागर होत असतो. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याशी संवाद साधण्यात आला. २०१४ साली पर्वती विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपण्यात आली होती. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक राष्ट्रीय स्तरावरही करण्यात आलं होतं.