मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा देत काळजी घेण्याचं आवाहन केलं. तसंच विरोधकांनी कितीही रडगाणं गाऊ द्या विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार असं विधानही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी केलं. दरम्यान, आज दहीहंडीनिमित्त राज्यभरात जल्लोष पाहायला मिळत आहे.