प्रियांकाने जे काही कमवले ते स्वतःच्या बळावर आणि फक्त आणि फक्त मेहनतीवर कमावले आहे. आमच्या कुटुंबातले अधिकतर सदस्य हे लष्करात आहेत. अभिनयाचा आणि आमच्या कुटुंबाचा तसा काहीच संबंध नाही. तिला स्वतःला इंजीनिअर व्हायचे होते. पण नशिबात मात्र काही वेगळेच लिहिले होते. ती अभिनय क्षेत्रात आली आणि स्वतःच्या मेहनतीने तिने आतापर्यंत एवढं नाव कमावलं आहे.