दादासाहेब फाळके यांना चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. त्यांनी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी तयार केलेले चित्रपट हे मूकपट होते. पहिला बोलपट आला १९३२ मध्ये. ज्याचं नाव होतं अयोध्येचा राजा. व्ही शांताराम यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात दुर्गा खोटे, गोविंदराव टेंबे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाला आज ८८ वर्षे पूर्ण झाली आहेत.