अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकिरा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या मृण्मयीला ही कथा नेमकी सुचली कशी? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र या कथेमागे ट्रॅफिकचं एक खास कनेक्शन आहे. हे कनेक्शन नेमकं काय ते मृण्मयीने लोकसत्ताच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये बोलताना सांगितलं.