अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक भन्नाट प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. अभिनेता सुव्रत जोशी आणि सायली संजीव यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये झालं असून चित्रीकरणासाठी हे ठिकाण निवडण्यामागे एक खास कारण आहे. हे कारण चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सांगितलं.