सुव्रत जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘मन फकीरा’ हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने केलं आहे. मृण्मयीने पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. यापूर्वी मृण्मयी आणि सुव्रतने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. मात्र पहिल्यांदाच मृण्मयी सुव्रतची सहकलाकार नसून दिग्दर्शिका आहे. त्यामुळेच एक दिग्दर्शिका म्हणून मृण्मयी कसं काम करते हे सुव्रतने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सांगितलं.