कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना प्रेक्षकांनी प्रेमापोटी काही खास टोपणनावं दिली आहेत. यातलंच एक नाव म्हणजे भाऊ कदम. ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याचं नाव भालचंद्र कदमवरुन भाऊ कदम कसं झालं हे त्याने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सांगितलं.