आपल्या विनोदाने प्रेक्षकांना त्यांचं टेन्शन विसरायला लावणारा भाऊ कदम हा आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, विनोदवीर म्हणून ओळखला जातो. यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्यामध्ये कधीकाळी न्युनगंडतेची भावना होती. त्यावेळी त्याच्या मनाची नेमकी अवस्था कशी होती हे त्याने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितलं.