महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असा लौकिक असलेले पु.ल. देशपांडे यांचा आज विसावा स्मृतीदिन. आज ते आपल्यात नाहीत या गोष्टीला २० वर्षे उलटली आहेत. मात्र ते आपल्या प्रत्येकाच्या मनात राहतील ते त्यांच्या अभिजात लेखनशैलीमुळे, जबरदस्त निरीक्षणशक्ती, कमालीची विनोदबुद्धी आणि गोष्ट सांगण्याचं कसब त्यांच्या अंगी होतं.. म्हणूनच ते कधीही विस्मृतीत जाणार नाहीत.