अभिनेत्री, निवेदिका, सूत्रसंचालिका, लेखिका, दिग्दर्शिका आणि आता शेतकरी असा यशाचा आलेख चढणाऱ्या अभिनेत्री संपदा जोगळेकर यांनी नुकतीच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मनमुराद गप्पा मारत शेती आणि अभिनयासह अनेक गोष्टींवर उत्तमरित्या चर्चा केली.