नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज असा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. उत्तम अभिनय आणि दर्जेदार कथानकांमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये भूमिका निवडण्यामागचे काही निकष सांगितले आहेत.