दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांची सून उपासना कोनिडेला हिने हैदराबादमधल्या अभयारण्यातील ‘राणी’ नावाच्या हत्तिणीला दत्तक घेतलं आहे. उपासना ही दाक्षिणात्य अभिनेता राम चरणची पत्नी आहे. एका वर्षासाठी तिने या हत्तिणीला दत्तक घेतलं असून पाच लाख रुपयांचा धनादेशसुद्धा तिने या अभयारण्याला दिला.