सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिका गाजतांना पाहायला मिळत आहेत. मात्र, अनेक मालिकांमध्ये केवळ सासू-सून या एकाच मुद्द्यावर भाष्य केलं जातं. किंबहुना त्याच धर्तीवर आधारित या मालिकांची कथा असते. त्यामुळे अनेकदा अशा मालिका ट्रोलिंगच्यादेखील शिकार होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांना या सासू-सूनेच्या मालिकांविषयी नेमकं काय वाटतं ते त्यांनी सांगितलं आहे.