‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्यात परेश रावल यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्याबरोबर त्यांनी उपस्थित प्रेक्षकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी मनोरंजनसृष्टी, नाट्यसृष्टी आणि कलाकारांचं तोंडभरून कौतुक केलं. इतकंच नाही तर गुजराती नाटकं ही मराठी नाटकांवरून प्रेरित असतात अशी कबुलीही त्यांनी दिली.