दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मराठी रंगभूमी व कलाकारांचं कौतुक केलं. नाटकाकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहणे चुकीचं असल्याचं ते म्हणाले. परेश रावल यांनी त्यांच्याबाबत घडलेला एक किस्साही यावेळी सांगितला.