‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्यात परेश यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्याबरोबर त्यांनी उपस्थित प्रेक्षकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी मनोरंजनसृष्टी, नाट्यसृष्टी आणि कलाकारांचं तोंडभरून कौतुक केलं, तसेच त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर भाष्य केलं आहे. चित्रपटांप्रमाणे नाटकदेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर यायला हवे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.