पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना ‘बलोच’मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे, स्मिता गोंदकर, अमोल कांगणे यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी प्रवीण तरडेंनी चित्रपटातील रोमँटिक सीनवर बायकोची आलेली प्रतिक्रिया आणि चित्रीकरणादरम्यानचा भन्नाट किस्सा सांगितला.