अनुपम खेर सध्या त्यांच्या ‘IB71’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. खेर यांनी नुकतेच ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “जे लोक या चित्रपटाला विरोध करत आहेत, ते तेच आहेत ज्यांनी गेल्या वर्षी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टीका केली होती. सत्य घटनांवर आधारित असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून असे चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत हे चांगलं आहे” अशी प्रतिक्रिया खेर यांनी व्यक्त केली.