थॅलेसेमियाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी काल म्हणजेच 8 मे रोजी मुंबई जवळील वनक्षेत्रात जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त जनजागृती शिबिराला उपस्थिती लावली. थॅलेसेमियाबद्दल जनजागृतीसाठी अभिनेता श्रॉफसह इतर टीम सदस्यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी जॅकी श्रॉफ म्हणाले, “लोकांना थॅलेसेमियाबद्दल माहिती नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही येथे लोकांना जागरूक करत आहोत की कुटुंबाचे नियोजन करण्यापूर्वी पालकांनी रक्त तपासणी करणे आवश्यक आहे…”