‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजमध्ये प्रिया बापटने पूर्णिमा गायकवाड ही प्रमुख भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या पहिल्या सीझनमधील प्रियाच्या एका लेसबीयन कीसिंग सीनची प्रचंड चर्चा झाली होती. या सीनमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. काही प्रेक्षकांनाही तो सीन खटकला होता. हा सीन करताना नेमकी प्रियाची काय मनस्थिती होती अन् एक अभिनेत्री म्हणून ती याकडे कसं बघते याबद्दल तिने या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.