बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बॉलिवूडचे व्हिलन अशी ओळख असलेले आशिष विद्यार्थी हे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले. आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता त्यांनी दुसरं लग्न का केलं आणि त्यांची पहिली भेट कशी झाली, याबद्दल सविस्तर भाष्य केले आहे.