अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान सध्या त्यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. गेल्या शुक्रवारी (२ जून) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच विकी आणि साराने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.