Adipurush Dialouges: ट्रोलिंगनंतर ‘आदिपुरुष’च्या टीमचा मोठा निर्णय; वादग्रस्त संवाद बदलले जाणार
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट थिएटर्समध्ये पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यामधील डायलॉग व व्हीएफएक्सची चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले डायलॉग ऐकून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. रामायणमधील हनुमान अशी भाषा खरंच बोलायचे का? असे प्रश्नही नेटकरी विचारत आहेत. सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अखेर निर्माते-दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग्स बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. याची माहिती संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी दिली.