Ajay Purkar as Bajiprabhu:”पावनखिंडीत चित्रीकरणादरम्यान भास झाले”; अजय पुरकरांनी दिला आठवणींना उजाळा
गेले अनेक महिने ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठा पडदावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाची टीम लोकसत्ताच्या कार्यालयात आली असता अभिनेते अजय पुरकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किस्सा सांगितला.