गेले अनेक महिने ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यानिमित्ताने सुभेदार चित्रपटाच्या कलाकारांनी ४ ऑगस्टला ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये दिलखुलासपणे संवाद साधला. यावेळी अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना कोणती आव्हानं समोर होती याबाबत सांगितला आहे.