Nana Patekar: “ही काल्पनिक कहाणी नसून खरी गोष्ट आहे”; The Vaccine War चित्रपटाबद्दल नानांचे विधान
विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या नाना पाटेकर यांनी चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली. “ही काल्पनिक कहाणी नसून खरी गोष्ट आहे” असे विधानही त्यांनी यावेळी केले.