तीन जिवलग मित्रांच्या गंमतीशीर मजामस्तीतून घडलेल्या जांगडगुत्त्याची गोष्ट प्रसिद्ध अभिनेते ह्रषिकेश जोशी दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने हृषिकेश जोशी, अभिनेता आलोक राजवाडे आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट देत संवाद साधला.