रंगभूमीवर सध्या विविध प्रयोग होत आहेत ज्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापैकीच एक म्हणजे ‘मुशाफिरी.’ यामध्ये संगीत नाटक, अभंग, भारूड, लोकगीत, गवळण, लावणी तसेच कथावाचन, कवितावाचन, बतावणी, नाट्यप्रवेश, एकपात्री सादरीकरण असे पारंपारिक मराठी गद्य आणि पद्य साहित्यप्रकार सादर केले जातात. विशेष म्हणजे हा सगळा साहित्यप्रवास पु. ल. देशपांडे आणि त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील काही पात्रांच्या नजरेतून उलगडला जातो. यानिमित्ताने स्वानंद केतकर, अक्षता आपटे, ऋग्वेद फडके, मयूर सुकाळे, रोहन देशमुख, आकांक्षा अशोक यांच्याशी साधलेला संवाद…