स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट येत्या ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘सत्यशोधक’चे दिग्दर्शक नीलेश जळमकर, निर्माते भीमराव पट्टेबहादूर, अभिनेता संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.