प्रेम, लग्न, कमिटमेंट, संसार या आगळ्यावेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून क्लासमेटनंतर सिद्धार्थ चांदेकर व सई ताम्हणकर यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल. याच निमित्ताने सई-सिद्धार्थने ‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या.