‘आता वेळ झाली’ या सिनेमात प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी प्रमुख भूमिकेत आहेत. या दोघांनी चित्रपटात शशिधर लेले आणि रंजना लेले या भूमिका साकारल्या आहेत. वयाच्या पासष्टीनंतर इच्छामरणाचा अधिकार मागणाऱ्या जोडप्याची कथा आपल्याला ‘आता वेळ झाली’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.