मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित ‘आम्ही जरांगे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारत आहेत. तसेच माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर यांनी साकारली आहे. याशिवाय या सिनेमात सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील.