कोकणी माणसाचं अन् गणेशोत्सवाचं एक अजोड नातं असतं. गणपतीनिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र जमतं. ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. हा चित्रपट येत्या २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देव, भूषण प्रधान, अश्विनी भावे व दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावली होती.