बिग बॉसच्या घरात पाहुणे येऊन आज नवा टास्क रंगणार आहे. तत्पूर्वी गुलीगत म्हणजेच सुरज चव्हाण पूर्ण फॉर्ममध्ये आल्याचं दिसतंय. सुरज चव्हाणने अभिजीत सावंतशी बोलताना मीच बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जाणार असं ठाम सांगितलं आहे आणि ट्रॉफी जिंकल्यावर सर्वात आधी आपण कुठे जाणार याबाबत सुद्धा गुलीगत बोलताना दिसतोय. कलर्स मराठीच्या बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये आज काय नेमकी धम्माल होणार याची ही लहानशी झलक पाहा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी कलर्स मराठी पाहायला विसरू नका.